Thursday, March 31, 2022

शब्द हे


का उमलत नाही ही कविता,

का निष्ठुर झाले शब्द हे.


पावसाच्या सरी येई अंगावरती,

झाडे ही आनंदाने नाचती,

हे सारे बघूनही,

का उमलत नाही ही कविता,

का निष्ठुर झाले शब्द हे. 


आपल्याच विचारात असते मन हे,

तरीही स्वतःसाठी वेळ नाही,

हे सगळे कळूनही,

का उमलत नाही ही कविता,

का निष्ठुर झाले शब्द हे.


काय असावे या झाडांचे म्हणणे,

आधारच देतो- असू दे ऊन, पाऊस अथवा वादळे, 

ह्या त्यांच्या आनंदाच्या उत्सवास बघूनही,

का उमलू नये ही कविता,

का निष्ठुर व्हावे शब्द हे.


- नेत्रा  

No comments:

Post a Comment

शब्द हे

का उमलत नाही ही कविता, का निष्ठुर झाले शब्द हे. पावसाच्या सरी येई अंगावरती, झाडे ही आनंदाने नाचती, हे सारे बघूनही, का उमलत नाही  ही  कविता, ...